Weather Alert: राज्यात आज कुठे पाऊस होणार? हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल झालेल्या मान्सूनचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात पुढे आठ दिवस मान्सूनचा प्रभाव कमी जाणवेल, असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात विविध ठिकाणी पाऊस पडेल, अशी माहिती दिली आहे. (Weather Alert IMD predicted alerted rain shower in various places of Maharashtra mostly in Kokan)

सॅटेलाईट आणि रडारच्या आधारे घेण्यात आलेल्या माहितीनुसार पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड, रोहा, रायगड, अलिबाग, मोडकसागर, रत्नागिरी, दापोली, हरणाई, दक्षिण कोकणात पुढील तीन ते चार तासात पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने (Rain) सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्‍यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्यादृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही, असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *