Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती मिळालेल्या सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील एप्रिल- मे महिन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात (Gold Import) झाली आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात तब्बल 7.91 कोटी डॉलर्स इतक्या मूल्याच्या सोन्याची आयात झाली. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू खात्यात (current deficit) मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. चालू खात्यातील तुटीचा आकडा 21.38 अब्ज डॉलर्स इतका आहे. (Gold import in India in Current financial year)

तर दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी मात्र कमी होताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल आणि मे महिन्यात 2.76 कोटी डॉलर्स मूल्याची चांदी आयात करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 93.7 टक्क्यांनी घटले आहे. भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात प्रामुख्याने दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो. त्यासाठी दरवर्षी 800 ते 900 टन सोने आयात केले जाते.

सोन्याचा भाव अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर
गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात 86 रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 46956 रुपये इतका झाला होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. 14 एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा 46831 रुपये इतका होता. तर 15 एप्रिलला हाच दर प्रतितोळा 47401 रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *