J&K Cop Killed | दहशतवादी हल्यात जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याची हत्या. दहशतवाद्यांनी घरात घुसून केली ह्त्या. कालच जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचं नियोजन केंद्र सरकार करत असतानाच जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये दोन छोटेसे स्फोट झाले होते. 26-27 जूनच्या मध्यरात्री पाच मिनिटाच्या अंतरानं हे स्फोट घडलेत. हे स्फोट दहशतवाद्यांनी घडवलेत की आणखी कुठल्या कारणानं घडलेत याचा तपास सुरु आहे. NIA ची टीम जम्मू एअरफोर्स स्टेशनवर पोहोचलीय.

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेले स्फोट हा दहशतवादी हल्ला आहे का याबद्दल अजून तरी स्पष्ट अशी माहिती दिली गेलेली नाही. पण हल्ल्यात स्फोटकं वापरण्यासाठी ड्रोनचा वापर झाला असावी अशी शंका बळावत चालली आहे. IED हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर झाल्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. जम्मू एअरफोर्स स्टेशनपासून बॉर्डर 14 किलोमीटर दूर आहे आणि ड्रोनचा वापरत करत असा हल्ला 12 कि.मी.पर्यंत करता येऊ शकतो. तसाच IED चा वापर करत हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *