Gold Hallmarking: नियम लागू झाला, पण हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना पाहावी लागणार वाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Gold Hallmarking in India may delayed)

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *