भारताविरुद्धच्या सामन्यात महाविक्रम करणार हा खेळाडू!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या एका खेळाडूसाठी खास असेल. जगातील कोणत्याही खेळाडूने आजवर अशी कामगिरी केली नाही ती करण्याची संधी क्रिकेटपटूला मिळणार आहे.
भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा १०० वा कसोटी सामना असेल. जगातील अनेक क्रिकेटपटूंनी शंभर कसोटी सामने खेळले आहेत. पण रॉस टेलर असा पहिला क्रिकेटपटू असेल ज्याने वनडे, टी-२० आणि कसोटीमध्ये शंभर सामने खेळले आहेत.
जगातील कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात प्रत्येकी १०० सामने खेळले नाहीत. काही खेळाडूंनी वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये १०० तर काहींनी वनडे आणि कसोटीमध्ये १०० सामने खेळले आहेत. पण तिन्ही प्रकारात १०० सामने खेळणारा टेलर पहिला खेळाडू ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *