हा भारतीय धावपटू टाकतो हुसेन बोल्ट ला ही मागे !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – बेंगळुरू : कर्नाटकमधलं श्रीनिवास गौडा हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. श्रीनिवासनं कामगिरीच तशी केलीय. कंबाला या चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीत बक्षिसांची लयलूट केली. कंबाला शर्यतीच्या एका रेफ्रीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासचा वेग थक्क करायला लावणारा आहे. त्यानं 142.5 मीटर अंतर हे 13.62 सेकंदांमध्ये पार केलंय. त्यात 100 मीटर अंतरासाठी त्याला 9.55 सेकंद लागले आहेत. त्यामुळं अचानक श्रीनिवासनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय.

विशेष म्हणजे, श्रीनिवासला शाळेतून काढून टाकण्यात आलंय. सध्या शर्यतींचा सिझन असेल तर तो, शर्यतीचीच तयारी करतो तर, इतर दिवशी तो बांधकाम साईटवर काम करतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्याला शर्यतींचा छंद लागला आहे. शर्यत जिंकल्यानंतर श्रीनिवासला 1 ते दोन लाख रुपयांचं रोख बक्षीस मिळतं. त्यासाठी तो बैलांना तयार करत असतो. बैलांचे मालक वेगळे असता. त्या बैलांना शर्यतीसाठी तयार करण्याची जबाबदारी फक्त त्याच्यावर असते. मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून तो स्वतःचं मानधनं घेतो.

उसेन बोल्टचं रेकॉर्ड
महान धावपटू उसेन बोल्ट (जमैक) यानं बर्लिनमध्ये झालेल्या 2009च्या जागतिक ऍथलेटिक स्पर्धेत विक्रम नोंदवला होता. त्यानं 9.58 सेकंदांत 100 मीटर अंतर पार केलं होतं. त्यानं या स्पर्धेत 27.8 मैला प्रति किलोमीटर असा वेग नोंदवला होता. कर्नाटकचा श्रीनिवासनं कर्नाटकमध्ये एका स्पर्धेत 9.55 सेकंदांत 100 मीटर अंतर पार केलंय. त्यातही श्रीनिवास शर्यतीत बैलांना खेचत आहे. त्यामुळं तो एकटा धावला तर आणखी कमी वेळेत अंतर पार करू शकतो, असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *