मॅट्रिक पास विद्यार्थ्यांनां मिळू शकते रेल्वेत नोकरीची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली : Indian Railway Recruitment 2020 रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु होत आहे. Railway Recruitment Boardने अनेक पदांसाठी भरती सुरु केली आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १४ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे. रेल्वेकडून जवळपास २७९२ पदांसाठी भरती होणार आहे. योग्य उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
पदांची संख्या – २७९२
विभागाने अप्रेंटिसअंतर्गत या पदांसाठी भरती सुरु केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.
१३ मार्च २०२०, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारला जाऊ शकतो.
पात्रता – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ५० टक्के गुणांसह, १०वीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वेग-वेगळ्या पदांनुसार, शैक्षणिक पात्रताही वेग-वेगळी आहे.
वयोमर्यादा -या पदांसाठी उमेदरांचं कमीत-कमी वय १५ वर्ष तर अधिकाधिक वय २४ वर्ष असणं आवश्यक आहे.
शुल्क – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी एससी, एसटी, महिला, पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तर इतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना १०० रुपये भरावे लागणार आहेत.

या रिक्त जागांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे.

अधिकृत माहितीसाठी –
या भरतीबाबत अधिकृत नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी http://139.99.53.236:8080/rrcer/Notification%20-%20Act%20Apprentice%2020... या लिंकवर क्लिक करा. याशिवाय अधिकृत साईटसाठी https://er.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *