राष्ट्रवादी काँग्रेस चे गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पिंपरी चौकात जन आंदोलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेस चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष माननीय श्री.संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वात आज दि.3 जुलै वार शनीवार रोजी सकाळी 11.30 वाजता केंद्र शासन वारंवार करीत असलेल्या गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात…पिंपरी चौकात जन आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारक च्या विरोधात घोषना देवून महागाई बाबत सरकारचा निषेध करण्यात आला. महिलांनी चूल पेटवून व बांगड्या फोडून केंद्र सरकारचा निषेध केला. सरकारने इंधन वाढीचे दर कमी करावेत अशी मागणी करण्यात आली. 

या आंदोलनात माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, गिता मंचरकर, राजू बनसोडे, स्वाती काटे, माजी नगरसदस्य मचिंद्र तापकीर, महम्मद पानसरे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, शाम वाल्हेकर, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, अतुल शितोळे, घनश्याम खेडेकर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरसिटणीस विशाल काळभोर, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, महिला संघटिका कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, ओबीसी महिला अध्यक्ष सारिका पवार, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष वाघेरे पाटील आपल्या निषेध पर भाषणात म्हणाले की, “गॅस सिलेंडरच्या दरात रोज वाढत आहेत. तर पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे. केंद्र सरकारने महागाईने व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकले आहे. जगावं की मरावं अशी परिस्थिती झाली आहे. . ……..पि.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *