देशातील सर्वच मोठ्या शहरांत पेट्रोल शंभरीपार तर डिझेल शतकाजवळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 31-39 पैसे तर डिझेलच्या दरात 09-15 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशभरात सर्वच राज्यात पेट्रोल-डिझेलची किंमत ही नव्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेलचा प्रतिलिटर दर 97.18 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 8 July 2021)

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आज (8 जुलै) इंधन दरवाढीसह दिल्लीत पेट्रोलची किरकोळ किंमत 100.56 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किरकोळ किंमत ही प्रतिलिटर 89.62 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबईत आज एका लीटर पेट्रोलची किंमत ही 106.59 रुपये असून डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.18 रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

शहर पेट्रोल (रुपये/लीटर) डिझेल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली 100.56 89.62
मुंबई 106.59 97.18
कोलकाता 100.62 92.65
चेन्‍नई 101.37 94.15
बंगळूरु 103.93 94.99
हैदराबाद 104.50 97.68
पाटणा 102.79 95.14
जयपूर 107.37 98.74

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *