कोरोना निर्बंध पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । पुणे ,  पिंपरी चिंचवड  आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या सुरु असलेले कोरोनाचे Corona निर्बंध यापुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. शहरातील दुकाने पूर्वीप्रमाणे दुपारी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय फेरीवाल्यांना चार वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला असल्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शहरातील सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मागणी केली होती. परंतु कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळेत बदल करण्याबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला नाही.

सद्यःस्थितीत पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर ४.९ टक्के, पिंपरी चिंचवडमधील ५ टक्के तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर ७.३ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा सरासरी कोरोनाबाधित दर हा ६ टक्के आहे. शिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील कायम आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. हा विकेंड लॉकडाऊन यापुढेही कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *