Horoscope : या राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस शुभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै ।

मेष : आजचा दिवस कामाने भरलेला असेल. आपल्या चांगल्या कामाने लोकांना आकर्षित कराल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नव्या विचारांवर आज काम करा. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

वृषभ : आजचा दिवस चांगला असेल. कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटून घेऊन नका. तुमची मुलं बिझनेसमध्ये चांगला सपोर्ट करतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

मिथुन : रखडलेलं काम पू्र्ण झाल्यामुळे तुम्हाला अतिशय आनंदी होईल. आजचा दिवस खूप अनुकूल आहे . व्यापार चांगला राहिल. उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : शरीर आणि मनाने अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित राहाल. आज तुमच्या राहणीमानात बदल करावे लागतील . निर्णय अचूक ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : अनेक गोष्टीत आज नशिबाची साथ असेल. आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करा. कमाईचे नवे सोर्स मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. जबाबदारी येऊन पडण्याची शक्यता आहे.

कन्या : मंगळवार कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. नवा विचार आर्थिक परिस्थितीत बदलण्यास फायदा होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ : शुभ समाचार मिळण्याचे योग तयार होतील. आपल्या क्रिएटिव्हीने लोकांचं लक्ष वेधून घेईल. जरूरी महत्वाचं काम पहिलं करा, यश मिळेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : महत्वपूर्ण गोष्टीत मित्रांशी संवाद साधाल. रखडलेली काम पूर्ण होतील. व्यावसायिक कार्यात अनेक महत्वाच्या गोष्टी घडतील. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : आजचा दिवस सुखद आणि आश्चर्यकारक असेल. चांगल्या मनाने केलेलं काम बदल करेल. नवीन गोष्टी लाभदायी ठरतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : आपल्या कामात मन प्रसन्न ठेवा. याचा खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कामाशी संबंधित गोष्टी कराल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. आजची सर्व काम खुबीने कराल. व्यापारी क्षेत्रात लाभ मिळेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

मीन : आपल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. थोडी मेहनत घ्याल तर चांगल्या ठिकाणी पोहोचाल. जीवनसाथीच्या नावाने केलेली काम फायदेशीर ठरतील. आर्थिक सुयश लाभेल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *