राष्ट्रपती की 2024 ची तयारी?:शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांत चर्चांना ऊत आले आहे. काहींनी तर शरद पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पण, शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठी तयारी असल्याच्या वृत्तावर अधिकृत काहीही समोर आलेले नाही. यामध्ये दोन शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

2024 मध्ये भाजपला आव्हान देण्याची तयारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेळा भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले हे अजुनही स्पष्टपणे समोर आलेले नाही. या भेटी-गाठीनंतर आता मात्र प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2017 नंतर राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही पहिलीच भेट होती. या बैठकीत प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. एवढेच नव्हे, तर विविध विरोधी पक्ष आणि भाजप विरोधी नेत्यांनी यात सहभाग नोंदवला. एकंदरीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान कसे देणार हा मूळ मुद्दा होता. परंतु, त्यात राष्ट्रपती पदावर सुद्धा चर्चा झाल्याचे माध्यमांनी सांगितले आहे.

2022 मध्ये संपणार राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. यानंतर पुढील राष्ट्रपती कोण होणार याचे गणित सध्या लावले जात आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव प्रशांत किशोर यांच्याकडून प्रोजेक्ट केले जात आहे असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतर पक्षांसह बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांना सोबत घेणे आवश्यक असल्याचे मत किशोर यांनी मांडले. त्यानुसार, किशोर यांनी पटनायक यांच्यासह एम. के. स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *