कच्चं दूध पिणे आरोग्य साठी हानिकारक ? हे वाचाच;

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । दूध सहसा उकळवूनच (Boiling Milk) प्यायलं जातं; मात्र काही जणांना दूध कच्चंच (Raw Milk) म्हणजे न उकळवता प्यायला आवडतं. कच्चं दूध आरोग्यासाठी (Healthy Drink) खूप लाभदायक असल्याचा एक समज आहे; मात्र नव्या संशोधनात असं आढळलं आहे, की कच्चं दूध प्यायल्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. एफडीएच्या (FDA) माहितीनुसार, कोणत्याही प्राण्याच्या दुधात साल्मोनेला (Salmonella), ई-कोलाय (E-Coli), लिस्टेरिया (Listeria) यांसारखे हानिकारक जिवाणू अस्तित्वात असतात. दूध न उकळवताच प्यायलं, तर या जिवाणूंमुळे फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होऊ शकतं. कच्च्या दुधाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, याची माहिती घेऊ या.

कच्च्या दुधात असे अनेक जिवाणू असतात, की जे शरीरात गेल्यावर रिअॅक्टिव्ह आर्थ्रायटिस, डायरिया, डिहायड्रेशन, गुलियन बॅरे सिंड्रोम, हीमोलायटिक युरिमिक सिंड्रोम अशा गंभीर विकारांना कारणीभूत ठरू शकतात.

– दूध काढलं जाताना जनावरांच्या मलमूत्राशी त्याचा संपर्क आलेला असू शकतो. त्यामुळे दूध दूषित असण्याची शक्यता असते.

– ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा व्यक्ती, मुलं आदींसाठी कच्चं दूध जास्त नुकसानदायी ठरू शकतं.

– कच्च्या दुधाच्या सेवनामुळे मळमळ, उलट्या किंवा डायरिया आदी त्रास जाणवण्याची शक्यता असते.

– कच्च्या दुधात असे अनेक जिवाणू असतात, की जे टीबी (TB) किंवा अन्य जीवघेण्या विकारांच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात.

– शरीरातली आम्लतेची पातळी (Acid Level) नियंत्रणात राहणं गरजेचं असतं. कच्चं दूध प्यायल्यानंतर शरीरातली आम्लतेची मात्रा वाढते.

– कच्च्या दुधात पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे हवेशी संपर्कात आल्यावर या दुधात जिवाणू वाढू लागतात. त्यामुळेच कच्चं म्हणजेच न उकळवलेलं दूध लवकर नासतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *