Share Market watch | आठवड्यात कशी असेल शेअर बाजाराची चाल? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । शेअर बाजाराची दिशा पुढील आठवड्यात जारी होणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही रिझल्ट तसेच जगभरातील बाजाराच्या संकेतांवर अवलंबून असणार आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या व्याजदरांच्या निर्णयावरही भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची नजर असणार आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी म्हटले की, ‘जुलै महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट सेटलमुळे बाजारात जास्त चढ उतार पाहायला मिळणार आहे. याशिवाय तिमाही निकालांचा परिणाम बाजारावर होणार आहे. आठवड्यात एक्सिस बँक, कोटक बँक, टाटा मोटर्स, मारूती, कोलगेट, टेक महिंद्रा, बेल आयओसी, सन फार्मा तसेच इंडिगो सारख्या मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत.’

वैश्विक स्तरावर कोविड 19 ची सध्याची परिस्थिती आणि 28 जुलै रोजी अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीतून काय निर्णय समोर येतो. या गोष्टी देखील बाजाराची दिशा ठरवतील.

सोमवारी रिलायंस इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीच्या तिमाही निकालांवर प्रतिक्रिया देतील. रिलायन्स इंडस्ट्रीचा जून तिमाहीचा नेट प्रॉफिट सात टक्क्यांनी घसरला आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *