महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । कृणाल पंड्या भारतीय संघाबाहेर पडल्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काल, दुसरा T -20 सुरु होण्याच्या आधी एक धक्कादायक बातमी आली. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू कृणाल पांड्या याची कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली. त्यानंतर हा सामना दुसर्या दिवशी म्हणजेच आज खेळला जाईल. कृणाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आज संघात बरेच मोठे बदल दिसू शकतात. श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी टीम इंडियात (Team India) हे 11 खेळाडू असू शकतात.
कोण घेणार कृणालची जागा?
संघातील अनेक खेळाडू आजच्या सामन्यात कृणाल पांड्या याची जागा घेण्यासाठी उत्सुक आहेत. कृणालच्या जागी नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम आणि राहुल यामधील एकाही खेळाडूला आज संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या तीन खेळाडूंमध्ये कृष्णाप्पा गौतम याला मोठी संधी आहे. गोलंदाजीत फिरकीसह कृष्णप्पाही वेगवान फलंदाजी करु शकतो. अशा परिस्थितीत त्याला आज संधी दिली जाऊ शकते.
पडिक्कल शॉ याची जागा कोण घेणार
प्रशिक्षक राहुल द्रविड आजच्या सामन्यात प्रथमच देवदत्त पडिक्कल याला संधी देऊ शकेल. पडिक्कल याने यापूर्वीच आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीसाठी चांगले प्रदर्शन केले आहे. एकदिवसीय मालिकेपासून आतापर्यंत त्याला संघात संधी देण्यात आलेली नाही, पण आज त्याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.