याला म्हणतात नशीबवान ! घरात खोदकाम करताना सापडला तब्बल इतके कोटींचा निलम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । नशिब बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट एका व्यक्तीसाठी तंतोतंत खरी ठरली आहे. या व्यक्तीला घरात खोदकाम करताना तब्बल 7.5 अरब रुपयांचा (750 कोटी) निलम सापडला.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील एका व्यापाऱ्याने घरात विहिर खोदण्याचे ठरवले. खोदकाम करताना त्याला 510 किलो वजनाचा निलम सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या निलमची किंमत 743 कोटी 78 लाख रुपये आहे. सध्या हा निलम कोलंबोतील एका बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला असून या निलमसाठी विदेशातून बोली लावली जात असल्याचे श्रीलंकेच्या राष्ट्रीय रत्न आणि आभूषण प्राधिकरणाने (एनजीजेए) सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *