देशातील तब्बल ६३ अभियांत्रिकी महाविद्यालये होणार बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । काही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद व्हावीत यासाठी 2015-16 पासून अर्ज करत आहेत आणि इतरांमधील क्षमतेत लक्षणीय घट झाल्यामुळे भारतातील अभियांत्रिकी संस्थांमधील एकूण जागांची संख्या एका दशकात सर्वात कमी झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट होऊन त्या २३.२८ लाखांवर आल्या आहेत.

इंजिनीअरिंगसाठीच्या जागांमध्ये या वर्षी मोठी घट झाली आहे, तसेच इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर असूनही शिक्षणक्षेत्रामधील एकूण जागांपैकी ८० टक्के जागा या इंजिनीअरिंगच्या आहेत. तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये २०१४-१५ साली सर्वाधिक म्हणजे साधारण ३२ लाख जागा होत्या. सात वर्षांपूर्वीपासूनच इंजिनीअरिंगच्या जागांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक महाविद्यालये बंद पडली. २०१५-१६ पासून दरवर्षी किमान ५० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत आणि आता या वर्षी ६३ महाविद्यालये बंद पडणार आहेत.

तंत्रशिक्षण परिषदेने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ५४ नवीन शिक्षणसंस्थांना मान्यता दिली आहे. जर राज्य सरकारला नव्या शिक्षणसंस्था उभारायच्या असतील तर या मागासलेल्या जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात आल्याचे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *