Rain update : पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज; पाहा पुढील तीन दिवस कुठे बरसणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरानंतर आता राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस (Rain) बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाहूयात हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार कशी असेल पावसाची स्थिती.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील हवामानाचा अंदाज

29 जुलै

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

30 जुलै

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

31 जुलै

1 ऑगस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *