फास्टॅग चे ‘हे’ नियम जरूर वाचा, अन्यथा दोनदा पैसे भरावे लागतील

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । सध्या देशभरात रस्त्याने प्रवास करताना टोल देण्यासाठी खास फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आलीय. ती आता बंधनकारक झालीय. त्यामुळे तुम्ही फास्टॅग असलेली गाडी चालवत असाल तर काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खात्यातून दोन वेळा पैसे कपात होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून महत्त्वाचे 5 नियम समजून घेऊयात.

# तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल आणि तरीही तुम्ही फास्टॅगच्या रांगेत आपली कार घातली, तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.

# याशिवाय तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसेल किंवा तुमचा फास्टॅग खराब झाला असेल आणि तुम्ही फास्टॅग रांगेत घुसलात तरीही तुम्हाला दुप्पट टोल
भरावा लागेल.

# तुम्ही तुमच्या गाडीसाठी थर्ड पार्टी इंशुरन्स घेत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला फास्टॅगची गरज आहे. आधी असा नियम नव्हता. त्यामुळे गाडीचा
विमा काढण्याआधी फास्टॅगबाबत काळजी घ्या.

# कोणताही गाडी मालक एकच फास्टॅग वेगवेगळ्या गाड्यांसाठी वापरु शकत नाही. प्रत्येक गाडीसाठी वेगळा फास्टॅग आवश्यक आहे.

# तुम्ही जर एखाद्या टोलवरुन दररोज प्रवास करत असाल तर तुम्ही यासाठी पासही काढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *