मुकेश अंबानींना देणार टक्कर ; 5 जीच्या दुनियेत टाटा ग्रुप क्रांती घडवणार,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । टाटा ग्रुप 5 जीच्या जगात क्रांती घडविण्याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओने आधीच 5G संदर्भात आपला मेगा प्लॅन जाहीर केला आहे. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा सन्स(Tata Sons)ने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्क(Tejas Network)मधील नियंत्रक भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5G मध्ये होईल आणि ती नोकिया(Nokia), एरिक्सन(Ericsson) आणि हुआवेई(Huawei) सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल. मुकेश अंबानीचीही 5 जी संबंधित एक मोठी योजना आहे. (Tata Group to revolutionize 5G world, competition with Mukesh Ambani)

रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की जिओच्या मदतीने आपण भारत 2G फ्री आणि 5 जी सक्षम बनवू. त्यांनी आश्वासन दिले की, देशात फक्त रिलायन्स जिओ(Reliance Jio)च 5G सुरू करेल. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे, जे वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठी झेप आहे. मुकेश अंबानी म्हणाले की 5 जी चाचण्या दरम्यान जिओने 1 जीबीपीएसपेक्षा जास्त वेग यशस्वीपणे गाठला आहे. मुकेश अंबानी यांनी जिओच्या ‘मेड इन इंडिया’ सोल्यूशन जागतिक दर्जाचे असल्याचे म्हटले. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. ते म्हणाले की जिओचा 5 जी भारतात यशस्वी होईल तेव्हा त्याची निर्यात जगातील इतर देशांमध्येही केली जाईल. अशा प्रकारे भारत 5G विकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *