शेकडो वर्षं जुनं शिवलिंग, आयर्लंडमधील रहस्यमय शिवलिंगाचे Photos

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । आयर्लंडच्या डोंगराळ भागात एक तारा हिल नावाची टेकडी आहे. या टेकडीवर एक पुरातन शिवलिंग आहे. याची स्थापना नेमकी कधी झाली, हे कुणालाच माहित नाही. स्थानिक याला एक रहस्यमय दगड मानतात.ऐतिहासिक दस्तावेजांनुसार 1632 ते 1636 च्या दरम्यान याची स्थापना झाली असावी. जादुई ताकद असणाऱ्या तुथा डि देनन याने याची स्थापना केली असावी, अशी चर्चा आहे.

तुथा डि देनन याचा अर्थ होतो देवी दानूची मुलं. इसवीसन पूर्व 1897 ते 1700 या काळात त्यांचं आयर्लंडमध्ये राज्य होतं. प्रजनन क्षमतेच्या मूर्तीचं प्रतीक म्हणूनही या दगडाकडं अनेक भिक्षूक पाहतात.युरोपीय परंपरेनुसार देवी दानू ही नदीदेवता म्हणजेच जलदेवता होती. इतरही अऩेक नद्यांची नावं तिच्यासोबत जोडली जातात. संस्कृतमध्ये दानूचा अर्थ आहे वाहणारं पाणी. वैदिक परंपरेवर श्रद्धा असणाऱ्यांना हे शिवलिंग आहे, असं वाटतं.

या शिवलिंगाचं नुकसान करण्याचे प्रयत्न अलिकडच्या काळात होत आहेत. जून 2012 मध्ये एका व्यक्तीनं हे शिवलिंग उद्धवस्त करण्याचा 12 वेळा प्रयत्न केला. तर 2014 साली काही समाजकंटकांनी इथं लाल आणि हिरवा रंग आणून ओतला होता.जगभर शिवपूजा केली जायची, याचा हा आणखी एक पुरावा असल्याचं मानलं जात आहे. नुकतंच आयसीसकडून उध्वस्त करण्यात आलेल्या पलमायरा, नीमरुद यासारख्या शहरांमध्येही शिवलिंगं असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *