भारतात सोन्याची मागणी 19 टक्क्यांनी वाढली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । चालू वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीच्या दरम्यान भारतामध्ये सोन्याची मागणी 19.2 टक्क्यांनी वाढून 76.1 टनाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड काउंसिल (डब्लूजीसी) यांनी आपल्या एका अहवालामधून दिली आहे.

साधारणपणे मागच्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊनच्या परिणामामुळे आर्थिक स्थिती नुकसानीत राहिली होती. सोन्याच्या मागणीचा कल हा वर्ष 2020 च्या दुसऱया तिमाहीत अधिक प्रभावीत होत 63.8 टनावर राहिला होता.

भारतात या काळात 23 टक्के वाढीसह 32 हजार 810 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी नोंदवली गेली आहे. 2020 च्या याच कालावधीत 26,600 केटी रुपयांच्या सोन्याची मागणी नोंदवली गेली होती.

कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रवासात मागील तिमाहीच्या तुलनेत मागणी 46 टक्क्यांनी घसरली आहे. यासोबत सध्याच्या वर्षात पहिल्या सहामाहीत एकूण मागणी ही 157.6 टन होती जी 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 46 टक्के राहिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *