‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार साजरा होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव साजरा होणार आहे. लालबागच्या राजाच्या जगभरातील करोडो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोविड 19च्या (Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “आरोग्य उत्सव” साजरा करून आदर्श निर्माण केला होता.

यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र यंदा पुन्हा एकदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार आहे.

यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली आखून दिली आहे. ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असंही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *