व्यवसायाचे एकापेक्षा जास्त बॅंकेत चालू खाते असतील तर बॅंक आपले खाते कब्जा (Seized) करू शकते का ?….पि.के.महाजन.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । एखाद्या व्यावसायिकाचे एका पेक्षा जास्त बॅंकेत चालू खाते असतील म्हणून एखाद्या बॅंकेला त्या ग्राहकाचे खाते बंद करायचे असेल तर त्या बॅंकेने तशी लेखी सुचना देने आवश्यक आहे…..परंतू कोणतीही पुर्व सूचना न देता बॅंक आपले खाते कब्जात घेते म्हणजे seized करते …..म्हणजे आपल्याला खात्यातून पैसे काढता येत नाहीत आणि भरताही येत नाहीत…..असे काम काही बॅंकांनी चालू केले आहे….आणि त्या बद्दल बॅंकेच्या अधीकारींना विचारले असता…रिझर्व्ह बँकेने ते कब्जात seized केले आहे ….त्यांच्या हातात काहीच नाही असे उत्तर बॅंक अधीकारी देतात….फार फार तर रिझर्व्ह बँकेला खाते पुन्हा चालू करण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम काढून खाते बंद करण्यात यावे असा अर्ज बॅंकेला करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच राहत नाही. अर्ज केल्यानंतर… पधरा दिवस झाले तरी त्यावर बॅंकेचे उत्तर मिळत नाही….थोडक्यात बॅंकां च्या ह्या चुकीच्या पद्धतीला आळा घातला पाहीजे….समजा बॅंकांचे काही नियम असतील ही आणि काही सक्षम कारणास्तव बॅंक खाते सिझ करू शकत असतील ही . ….परंतू अशा शुल्लक कारणामुळे खाते बंद करणे कितपत योग्य आहे….कमीत कमीत लेखी सुचना दिली तर व्यावसायिक त्याचे खाते स्वताहून बंद करेल.

अचानकपणे खात्याचे व्यवहार स्थगित केल्यामुळे व्यावसायिक अडचणीत येतात …एकतर कोरोना महामारी…लाॅकडावून मुळे व्यावसायिक हैराण झाले आहेत….बँकां आपल्या या त्रासदायक पद्धतीत सुधारणा करतील हिच अपेक्षा… “व्यावसायिक जनहितार्थ” ……पि.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *