HDFC खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 29 फेब्रुवारीपूर्वी करा ‘हे’ काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४;  एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचं वृत्त आहे. जर तुम्हीही एचडीएफसी बँकेच्या मोबाइल बँकिग अ‍ॅपचा वापर करत असाल तर आता 29 फेब्रुवारी 2020 नंतर तुमचं अ‍ॅप निष्क्रिय होईल. 29 फेब्रुवारीनंतर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करुन पैशांचा व्यवहार करु शकणार नाहीत. बँकेकडून याबाबत ग्राहकांसाठी एसएमएसद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

29 फेब्रुवारी 2020 नंतर मोबाइल बँकिंगसाठी एचडीएफसी बँकेचे जुने अ‍ॅप काम करणार नाही, पण बँकेचं लेटेस्ट व्हर्जन अपडेटेड अ‍ॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. काही महिन्यांपूर्वी एचडीएफसीच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे अनेक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पैशांच्या व्यवहारामध्ये अनेकांना खूप अडचणी येत होत्या. त्यानंतर कंपनीने नवीन अ‍ॅप आणले . नवीन अ‍ॅप बनवताना बँकेने सुरक्षेवर अधिक भर दिलाय. पण, अद्याप अनेक ग्राहकांनी नवे अ‍ॅप डाउनलोड केलेले नाही किंवा त्यांना माहिती नाही. त्यामुळे बँकेकडून ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे.

ग्राहक नव्या अ‍ॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच क्रेडिट कार्डसाठी अर्जही करु शकता. याशिवाय, बँकेकडून अ‍ॅपद्वारे ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटसह पासबुकबाबत माहिती दिली जाईल. एचडीएफसी बँकेशिवाय गुगल प्ले-स्टोअरवर अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, पीएनबी, एसबीआय, येस बँक आणि कोटक महिंद्रा यांसारख्या अनेक मोठ्या बँकांचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *