महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेला (Vedika Shinde) Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. तिच्या उपचाराकरता लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची सोय करण्यात आली. त्यासाठी तिच्या पालकांनी जीवाचे रान केले होते. मात्र वेदिकाचा मृत्यू झाला. (Vedika Shinde of Pimpri Chinchwad suffering from Spinal Muscular Atrophy died due to breathing Issue )
1 ऑगस्ट रोजी सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे 16 कोटीचं इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती. तिच्या इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमाही करण्यात आले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.