सोमवारी दुपारच्या सुमारास जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत कुणाल जाधव यांनी जीव धोक्यात घालून तिरंगा उतरवला.
महाराष्ट्र २४ ; मुंबई, :सोमवारी दुपारच्या सुमारास जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत कुणाल जाधव यांनी जीव धोक्यात घालून तिरंगा उतरवला. कुणाल यांनी प्रसंगावधान राखत तिरंग्याला आगीची, धुराची झळ बसू न देता सुरक्षित बाहेर काढलं त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेच. मात्र त्याच्या या धाडसाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कुणाल यांच्या धाडसाचं कौतुक सहाकाऱ्यांनीच नाही तर संपूर्ण सोशल मीडियावरही केलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जीएसटी भवनातील शिपाई कुणाल जाधव यांचा सत्कार करण्यात आला आहे. मुंबईतील माझगाव इथे जीएसटी भवनात लागलेल्या आगीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. कुणाल जाधव यांचा सोमवारी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. त्यांनी कुणाल यांच्या धाडसाचं तोंडभरून कौतुकही केलं.