कलाकार आणि चित्रपट ,जाहिरात निर्मिती संस्था यांचा समन्वय साधणारा अँप लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24;- पुणे- अनेक कलाकारांना जाहिरात क्षेत्रात किंवा चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते त्यांच्यात अभिनय क्षमता ही असते पण काही लोकांना या क्षेत्रात कसे काम मिळवायचे कोणाशी संपर्क साधायचा ?कोणत्या ठिकाणी ऑडिशन आहेत ? या सर्वांची माहिती कलाकारांना नसते आणि याची दुसरी बाजू म्हणजे असे अनेक जाहिरात निर्मिती संस्था किंवा चित्रपट निर्मिती संस्था असतात त्यांना कलाकारांची गरज असते पण दोन्ही बाजूनी संपर्क नसल्याने नाइलाज फ्लिम एजन्सी किंवा कोणत्या तरी एजंट ला हाताशी धरावे लागते.

या दोन्ही बाजूचा विचार करून रिफ्लेकॅशन मीडिया कंपनीने model click या अँप ची निर्मिती केली आहे याचा फ़ायदा कलाकार आणि जाहिरात आणि चित्रपट निर्मिती संस्था या दोघांना होणार आहे हा अँप डाउनलोड केल्या नंतर दोघाना ही एकमेकांशी संपर्क साधता येणार आहे.या अँप मध्ये कलाकारांनी त्यांची संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर त्याचे फोटोज हे लोड करावे.

मॉडेल क्लिक या अँप वरून 5000+ जाहिरात आणि चित्रपट निर्मिती संस्था कलाकारांना त्याचा योगते नुसार संपर्क करतील . हा या अँप चा उपयोग सर्व वय गटातील कलाकारांनी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *