पाकच्या गोळीबाराला सणसणीत उत्तर द्याः लष्कर प्रमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सतत गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सीमेवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे काश्मीर दौऱ्यावर गेलेत. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नरवणे हे नगरोटामध्ये दाखल झालेत. पाकिस्तानचे प्रयत्न मोडून काढण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती लष्कर प्रमुख घेणार आहेत. दरम्यान, नरवणे यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबाराला सणसणीत उत्तर द्या, असे आदेश त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी आहेत. पाकिस्तानी सैनिक शस्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करत आहेत. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरीसाठी हा गोळीबार करण्यात येतोय. पण भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिलं जातंय, असं काश्मीरमधील १५व्या कोरचे लेफ्टनंट  जनरल कंवलजीत सिंग ढिल्लन यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *