महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । ‘दिवाळीनंतर शाळा (School) सुरू करण्याच्या सूचना ‘टास्क फोर्स’ने (Task Force) केल्या आहेत. मात्र, अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे (Student) आणि शिक्षकांचे (Teacher) लसीकरण (Vaccination) पूर्ण झाले आहे, अशी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या (State Government) पातळीवर विचार सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
राज्य सरकारने मध्यंतरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन दिवसाच हा निर्णय मागे घेण्यात आला. याबाबत पवार यांचा विचारले असता, ते म्हणाले, ‘‘शाळा सुरू करण्याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘टास्क फोर्स’ने दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा निर्णय दिवाळीनंतरच होणार आहे.’
महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. काही संस्थांचालक आणि पालकांची देखील मागणी आहे. त्यामुळे अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच शिक्षक आणि अन्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण पूर्ण झाले आहे. अशा महाविद्यालयांना सर्व नियम पाळून परवानगी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बैलगाडा शर्यतीचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित असता, तर तो आम्ही सोडविला असता,’ असेही एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले. राज्यपालांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी याबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.