महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । देशातील आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन (सत्र -4) परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत गुरुवार, 26 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. एनटीएने या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेला देशभरातून सुमारे 92 हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार असून देश आणि विदेशातील 334 शहरांमधील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
जेईई मेनची ही परीक्षा पूर्णपणे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी https://Jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या जन्मतारखेची नोंद आणि इतर काही माहिती भरून हॉलतिकीट डाऊनलोड करून घ्यावेत, असे आवाहन एनटीएकडून करण्यात आले आहे. या हॉलतिकीटसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यासाठी हेल्पलाइन आणि ई-मेलची सोयही आहे.