विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीला ‘हा’ संघ वाटतो यंदाच्या टी-20 विश्व चषकाचा दावेदार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेला टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात युएई(UAE) आणि ओमान (Oman) या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेला अजून दोन महिने शिल्लक असूनही सर्वत्र याच भव्य स्पर्धेची चर्चा सुरु आहे. दरम्यान वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने (Dareen Sammy) यंदाचा विश्वचषक वेस्ट इंडिजच जिंकेल असा विश्वास व्यक्त करत त्याचे कारणही दिले आहे. 2016 साली वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषक जिंकला होता तो सॅमीच्याच कर्णधारीखाली. त्यानंतर आता पुन्हा वेस्ट इंडिजच स्पर्धा जिंकेल असा विश्वास सॅमीने व्यक्त केला आहे.

टी-20 विश्व चषकाचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. दरम्यान याआधीच्या 2016 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या ओव्हरमध्ये चार षटकार ठोकत दुसऱ्यांदा चषक मिळवला होता. याआधी 2012 मध्येही ते जिंकले होते. त्यानंतर यंदाही आम्हीच जिंकू असे सांगत सॅमी आयसीसीच्या एका डिजीटल कार्यक्रमात म्हणाला,‘‘मला यामध्ये अधिक विचार करण्याची गरज नाही. माझ्या मते वेस्ट इंडीजचा संघच स्पर्धा जिंकून चॅम्पियन बनणार आहे.’’

सॅमी विजयाचे कारण देताना म्हणाला,‘‘जेव्हा तुम्ही वेस्ट इंडीज संघाला पाहता तेव्हा तुम्हाला हे कळेल की मागील काही वर्षांपासून महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम चार सामन्यांपर्यंत पोहचला आहे. यात दोनदा विजयही मिळवला आहे. आमच्या खेळाडूंमधील क्षमता पाहता विजय नक्कीच आमचा असेल. कर्णधार कायरन पोलार्ड परत आलाय, ख्रिस गेल, आंद्रे रस्सेल, जेसन होल्डर, फॅबियन एलन, एविन लुइस असे धुरंदर संघात असल्याने हे सर्वजण स्वत:च्या जीवावर सामना बदलू शकतात.’’

सॅमीने वेस्ट इंडिज संघासोबतत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघही चांगले प्रदर्शन करतील असा म्हटलं आहे. तो म्हणाला, ‘‘जेव्हा तुम्ही इंग्लंड संघाचा विचार करता तुम्ही पाहू शकता सध्या त्यांचे टी-20 क्रिकेटमधील प्रदर्शन शानदार आहे. विश्वचषकातील मैदानांची स्थितीही त्यांच्यासाठी चांगली असल्याने ते उत्तम कामगिरी करु शकतात.” त्यानंतर ऑस्ट्रेलियाबाबत सॅमी म्हणाला,‘‘ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत टी-20 विश्वचषक मिळवलेला नाही. त्यामुळे ते ही स्पर्धा जिंकण्यासाठी फार उत्सुक आहेत. त्यांच्या खेळाडूंमध्ये ती क्षमता देखील आहे. त्यामुळे त्यांचा खेळही बहरणार हे नक्की.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *