गुजरात राज्यात दारूची अवैध तस्करी राजरोसपणे सुरु, गुजरातमध्ये दारू माफियाने पोलिस कॉन्स्टेबल जिवंत जाळले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवापूर –

गांधीजींच्या गुजरात राज्यात दारू बंदी केवळ नावालाच राहिली आहे. गुजरात राज्यातील शेजारील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दमण या भागातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात आहे. परंतू गुजरात गृहविभागाचे फारचे लक्ष दिसून येत नाही.महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यातील मयाली गावात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. सोनगड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केल्याने दारू माफियाला याचा राग आल्याने खाजगी गाडीत गेलेले पोलीस काॅन्स्टेबल प्रभात लक्ष्मण बारिया यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवण्यात आले. यात पोलिस कर्मचारी प्रभात बारिया 35 टक्के भाजले असून त्यांच्या सुरत येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

गुजरात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सोनगड तालुक्यातील मयाली गावात दारू विक्री करणारे मुळजी सेमडिया कडे कारवाई केली असता पोलीस आणि दारू माफियात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस व खाजगी गाडीवर पेट्रोल टाकून पेटण्यात आले यात पोलीस कर्मचारी 35 टक्के भाजले आहे. सोबत दारू माफिया देखील भाजला गेला आहे. तर पोलीसांची खाजगी संपूर्ण खाक झाली आहे. यासंदर्भात महसूल विभाग व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *