महाराष्ट्र 24 – मुंबई/बीजिंग –
जापानमधील भारतीय दूतावासाने आज(रविवार) सांगितले की, डायमंड प्रिसेंज क्रूजवरी अजून चार भारतीयांना कोरोना व्हायरस (कोविड-19) ची लागण झाली आहे. क्रूजवर आता एकूण 12 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मलेशिया, इंडोनेशिया, वियतनाम आणि नेपाळवरुन आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, चीन, हॉन्गकॉन्ग, सिंगापुर, थायलँड, जापान आणि दक्षिण कोरियावरुन आलेल्या प्रवाशांना तपासणी करुन घ्यावी लागेल.
क्रुजवर अकूण 1 हजार लोक अडकले
जापानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगाने सांगितले की, सध्या जहाजावर 1 हजार नागरिक अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी जापान सरकारने सांगितले होते की, जे निरोगी आहेत, ते 19 फेब्रुवारीपासून घरी जाऊ शकतात. शनिवारी अंदाजे 100 प्रवाशांना जहाजावरुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
हुबेई प्रांतात आतापर्यंत 2346 नागरिकांचा मृत्यू
चीनी अधिकाऱ्यांकडून क्लीअरंस न मिळाल्यामुळे भारतीय एअर फोर्सचे स्पेशल विमान गाजियाबादच्या हिंडन एअर फोर्स स्टेशनवर तयार आहे. विमानात मेडिकल उपकरण लोड केले आहेत. चीनच्या हेल्थ कमीशनने सांगितल्यानुसार, कोरोना व्हायरसने सर्वात जास्त हुबेई प्रांतात पसरला आहे. आतापर्यंत 2346 जणांचा मृत्यू झाला आहे तर 64 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आहे.
हुबेई प्रांतात 15,299 नागरिक ठीक झाले
हेल्थ कमीशनने सांगितले की, हुबेई प्रांतात 15,299 लोक ठीक झाले आहेत. 24 तासात 630 नवीन प्रकरणे समोर येत आहे तर 96 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरसमुळे इराणमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.