भारताची डोकेदुखी ठरलेल्या जेमिसनचा फलंदाजीतला अरिचीत विक्रम

Spread the love

महाराष्ट्र 24 – वेलिंग्टन-
भारताविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने अष्टपैलू खेळ केला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने भारतीय संघाला १६५ धावांत गुंडाळलं. यानंतर प्रत्युत्तरादाखल धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या डावात ३४८ धावांपर्यंत मजल मारत १८३ धावांची आघाडी घेतली.

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी चांगली फलंदाजी केली. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जेमिसनने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही चमक दाखवली. पहिल्या डावात जेमिसनने ४४ धावांची खेळी करत एक खास विक्रम केला आहे.

याव्यतिरीक्त न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पणात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही जेमिसनने पहिला क्रमांक पटकावला आहे. पहिल्या डावात जेमिसनने डी-ग्रँडहोमसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. जेमिसनने ४५ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *