महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । गणेश उत्सव मंडळाच्या (Ganesh Utsav Mandal) समोर ढोल पथकांना (Dhol Pathak) स्थिर वादन करण्याकरिता परवानगी (Permission) द्यावी, अशी मागणी शहरातील गणेश मंडळांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मंडळांनी आयुक्तांना दिले असून पाच वादकांना वादन करण्याची परवानगी द्यावी, असे त्यात नमूद केले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे यंदाही देखावे तयार न करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा. भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी. मंडळांनी आरोग्य सेतू ॲप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबवितानाही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केली आहे. याबरोबरच राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या नियमांचे पालन करतानाच पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार केली असून त्याचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंडळांच्या काही मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले.