Gold-Silver Price Today: सोनं दरात वाढ , ओलांडला 47000 रुपयांचा टप्पा !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 सप्टेंबर । आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate) तेजी पाहायला मिळाली आहे. यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा (Gold Price Today) 47000 पेक्षा जास्त आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Multi Commodity Exchange) वर आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.15 टक्क्यांनी वधारले आहेत. तर चांदीच्या दरातही किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या किंमतीत 0.15 टक्क्यांनी वाढ होऊन किंमती 47 हजारांपार गेल्या आहेत. MCX वर सोन्याचे दर प्रति तोळा 47,060 रुपये आहेत. तर चांदीच्या किंमतीत शुक्रवारी 0.02 टक्क्यांची किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे. या तेजीनंतर दर 63,297 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *