न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय

Spread the love

महाराष्ट्र 24 – वेलिंग्टन-
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखून मात केली आहे. न्यूझीलंडनं मालिकेत १-०अशी आघाडी मिळवली आहे.

सामन्यात सलग दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज फारशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावां केल्या. ज्यामुळं न्युझीलंडला विजयासाठी फक्त ९ धावांचे आव्हान होतं. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. हा भारतासाठी पहिला धक्का होता. यानंतर एकामागोमाग भारताचे सर्व फलंदाज माघारी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *