अखेर रोहित शर्माने शतक झळकावलं, विदेशात पहिल्यांदाच गाठला हा पल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर । लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीवर हिंदुस्थानने पकड मजबूत केली आहे. सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा याने नाबाद शतकी खेळी केली असून चेतेश्वर पुजारा अर्धशतकाच्या जवळ आहे. रोहित शर्मा याने पहिल्यांदाच विदेशामध्ये शतकाला गवसणी घातली आहे.

रोहित शर्मा याने 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने सात शतकं झळकावली होती, मात्र ही सर्व शतकं त्याने मायदेशात झळकावली होती. विदेशामध्ये शतक झळकावण्यापासून तो वंचित होता. लॉर्डस कसोटीमध्ये तो शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला होता. मात्र ओव्हल कसोटीमध्ये मोक्याच्या क्षणी रोहितने शतकी खेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *