महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर । बँक लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्याची प्रक्रिया तर तुम्हाला माहित असेल. पण अनेकांना हे माहित नसतं की या सोन्यावर बँका चांगलं व्याज देखील देतात. तुम्ही Gold Monetisation Scheme च्या माध्यमातून घरी असणारं सोनं बँकेत जमा करून त्यावर व्याज मिळवू शकता. यामुळे तुमच्याकडील सोनं सुरक्षितही राहिल आणि तुमची कमाई देखील होईल. जाणून घ्या काय आहे ही स्कीम आणि तुमचा फायदा कसा होईल
तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमअंतर्गत तुमचे सोन्याचे दागिने आणमि अन्य सोन्याची संपत्ती बँकेत जमा करून कमाई करू शकता.
या स्कीमअंतर्गत तुम्ही तुमच्याकडील सोनं बँकेत जमा करू शकता. यावर बँक तुम्हाला व्याज देईल. या स्कीमची विशेषता ही आहे की, तुम्हाला यात सोनं लॉकरमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आणि निश्चित स्वरुपात तुम्हाला व्याज मिळत राहिल.
या स्कीमअंतर्गत कमीतकमी 30 ग्रॅम 995 शुद्धतेचं सोनं बँकेत ठेवावं लागेल. यामध्ये बँका गोल्ड बार, नाणी, दागिने (मौल्यवान खडे किंवा इतर धातू नसणारे) मंजुर करतील. गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम 2015 मध्ये सुरू झाली होती.
याअंतर्गत तुम्हाला शॉर्ट टर्म डिपॉझिटमध्ये 1 वर्षासाठी 0.50 टक्के, एक वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 0.60 टक्के, 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 0.75 टक्के व्याज मिळते. लाँग टर्म डिपॉझिटमध्ये (12-15 वर्ष) 2.50% आणि मीडियम टर्म डिपॉझिटवर (5-7 वर्ष) 2.25% दराने व्याज मिळते.
कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतं. या योजनेला तुम्ही गोल्ड एफडी म्हणू शकता. कारण ही योजना बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटसारखी आहे. ज्यामध्ये तुम्ही जे सोनं वापरत नाही आहात ते जमा करू शकता आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला सोनं किंवा सोन्याच्या किंमतीवर व्याजाच्या लाभासह परतावा मिळेल. गोल्ड एफडीमध्ये जॉइंट अकाउंटच्या माध्यमातून देखील गुंतवणूक करता येते.