पुणे ; ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं भक्तांना आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना, भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. (Ganpati Mandals appeal to Punekars to enjoy Ganeshotsav online)

यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *