महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ सप्टेंबर । पुण्यात अद्याप २० लाख नागरिक लसीकरणापासून (Corona Vaccination) वंचित आहेत. पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (PCMC) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० लाख ३३ हजार ३९५ नागरिकांना अद्याप कोरोनाचा पहिला डोससुद्धा मिळू शकला नाहीये. तर ३९ लाख ३१ हजार ६५२ नागरिकांना दुसरा डोस मिळणे बाकी आहे. आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यत लसीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी ७९ लाख ९८ हजार ४४२ डोस लागणार आहे. जिल्ह्यात जवळपास ८५ लाख ३९ हजार नागरिक लसीकरणास पात्र आहेत. आतापर्यंत ६५ लाख ०६ हजार ३११ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी २५ लाख ७४ हजार ६५९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण ९० लाख ८० हजार ९७० डोस दिले आहेत.