महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । आजकालच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळात काहीजण भितीपोटी आणि माहिती नसल्यामुळे महागडा खासगी विमा घेतात. मात्र, केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत फक्त 12 रुपयांत दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतेय. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अतंर्गत फक्त 12 रुपयांत दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळते. कोरोना महामारीच्या काळात देशातील गरीब व्यक्ती देखील याचा लाभ घेऊ शकतो. जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल…
देशातील कोणताही व्यक्ती वर्षाला 12 रुपयांत दोन लाख रुपयांचे विमा सरंक्षण घेऊ शकत. 12 रुपयांत वर्षभर विमा संरक्षण मिळते. प्रत्येक वर्षाला विमा अद्यावत होत राहतो. मे महिन्यात या विम्याची रक्कम कटते. या योजनेमुळे आयुष्यात येणाऱ्या दुर्घटनेच्या काळात आर्थिक (Personal Accident Insurance Scheme) अडचणीचा सामना करावा लागणार नाही. 12 रुपयांच्या या विम्याअंतर्गत एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळू शकतात. जर एखादी दुर्घटना झाली आणि त्यात अंपगत्व आले तर विम्याची रक्कम दिली जाते. जर काही काळासाठी अंपगत्व आले असेल तर एक लाख रुपये इतकी रक्कम मिळते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ (PMSBY) 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते. प्रत्येक वर्षी 31 मे रोजी या योजनेचे 12 रुपये बँक खात्यातून कापले जातात. https://jansuraksha.gov.in/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर विमा योजनेचे फॉर्म आणि माहिती उपलब्ध आहे. हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बांगाली, कन्नड, ओडिया, तेलगू आणि तामिळ भाषेत दिला गेला आहे.