मुंबईत स्ट्रीट शॉपिंगसाठीची बेस्ट ठिकाणं ; कमी किमतीमध्येही भरपूर शॉपिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । मुंबईमध्ये तसं तर मोठमोठे मॉल्स आहेत; मात्र स्ट्रीट शॉपिंगला (Street shopping in Mumbai) पसंती देणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. तुम्ही पहिल्यांदाच मुंबईमध्ये जात असाल, तर कदाचित तुम्हाला शॉपिंगसाठी प्रसिद्ध (Shopping spots famous in Mumbai) असलेल्या विशिष्ट जागा माहिती नसतील. यासाठीच आम्ही तुम्हाला आज मुंबईत शॉपिंग करण्यासाठी बेस्ट (Best shopping places in Mumbai) अशी ठिकाण पहा .

हिल रोड : हे ठिकाणही (Hill Road) स्ट्रीट शॉपिंगसाठीच प्रसिद्ध आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे घासाघीस करता येत असेल, तर तुम्ही अगदी कमी पैशांमध्येही इथे चांगल्या प्रकारचं शॉपिंग करू शकता.

लिंकिंग रोड : कपड्यांसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण म्हणजे लिंकिंग रोड. कित्येक प्रकारचे मॉडर्न कपडे, ज्वेलरी, पादत्राणं अशा विविध गोष्टी या ठिकाणी (Linking Road) तुम्हाला मिळतील. हे ठिकाण मुंबईच्या पॉश एरियांपैकी एक असलेल्या बांद्र्यामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी स्ट्रीट शॉप्ससोबतच कित्येक ब्रँडेड शॉप्सही आहेत.

क्रॉफर्ड मार्केट : या जागेचं नाव तुम्ही मुंबईमध्ये कधीही आला नसलात तरीही ऐकलं असेल. मुंबईत स्ट्रीट शॉपिंग (Crawford Market) करण्यासाठी ही सर्वोत्तम अशी जागा आहे. शहरातल्या सर्वांत जुन्या बाजारांपैकी हा एक आहे. फळ-भाज्या यांपासून अगदी मेकअप आणि घरांमधल्या शोभेच्या वस्तूही या ठिकाणी स्वस्तात मस्त मिळून जातात. यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी, पर्स, बॅगा अशा गोष्टीही या ठिकाणी मिळतील.

कोलाबा कॉजवे : कायम गर्दी असणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक आहे. या ठिकाणी (Colaba causeway) तुम्हाला आर्टिफिशिअल ज्वेलरी, पर्सनलाइज्ड ज्वेलरी, कॅज्युअल वेस्टर्न कपडे, फूटवेअर, बॅग्स अशा गोष्टी मिळतील. यासोबतच तुम्हाला अँटिक गोष्टींची आवड असल्यास, त्याही या ठिकाणी उपलब्ध असतात.

हिंदमाता मार्केट : रेडिमेड कपड्यांसह विविध प्रकारचं कापड, साड्या आणि ड्रेस मटेरिअल एकाच ठिकाणी मिळण्याची जागा म्हणजे हिंदमाता मार्केट. दादरपासून जवळ (Hind Mata Market) असलेल्या या मार्केटमध्ये तुम्हाला हवी ती गोष्ट मिळणार नाही असं होतच नाही. शहरातलं सर्वात मोठं आणि सर्वांत जुनं ठोक मार्केट इथेच आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खरेदी करायची असेल, तर हिंदमाता मार्केट ही एकच जागा पुरेशी आहे.

 

मुंबईमध्ये शॉपिंग करायचं असेल, तर या पाच ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही कमी किमतीमध्येही भरपूर प्रमाणात शॉपिंग करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *