महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । पुण्यातील कार्ला लेणी पर्यटकांसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. यावेळी मात्र अतिवृष्टीमुळं हा निर्णय घेण्यात आलाय. काल एका तासात इथं धो-धो पाऊस बरसला, त्यात दरड ही कोसळली. एबीपी माझाने त्या एका तासाचा वृत्तांत समोर आणला. त्यानंतर आज मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मिळून पर्यटकांसाठी कार्ला लेणी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लाटेमुळे इथलं पर्यटनावर चार महिन्यांसाठी बंदी होती. ती 17 सप्टेंबरला उठवण्यात आली. पण अतिवृष्टीमुळं इथं पर्यटकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, म्हणून पुन्हा एकदा इथं पर्यटकांना बंदी घालण्यात आली.