या धोकादायक Appsवर गुगल ने घातली बंदी ; मोबाईलमधून लगेच काढून टाका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर ।Google bans 136 apps on Play Store: सावधान! तुमच्या फोनद्वारे तुमचे पैसे चोरले जात आहेत! आता, हॅकर्सना थांबवणे तुमच्यावर अवलंबून आहे. Zimperiumमधील सुरक्षा तज्ज्ञांनी अजून एक मालवेअरबाबत माहिती दिली. ज्याने जगभरातील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून लाखो डॉलर्स चोरले आहेत. धोकादायक गोष्ट अशी आहे की हे अ‍ॅप्स कदाचित तुमच्या फोनवर आहेत आणि तुमचे पैसे चोरू शकतात. गूगल प्ले स्टोअरने (Google Play Store) अशी 136 अ‍ॅप्स शोधली आहेत. जी अत्यंत धोकादायक आहेत आणि त्यांच्यावर बंदी घातली आहे. जर तुमच्या स्मार्टफोनमध्येही ही अ‍ॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. चला त्या अ‍ॅप्सची संपूर्ण यादी पाहूया.

तक्रारीनंतर गूगलची 136 अ‍ॅप्सवर बंदी
तक्रार दाखल झाल्यानंतर गूगलने कारवाईचे पाऊल उचलेले. तक्रार करण्यात आलेल्या 136 अ‍ॅप्सवर बंदी घातली. यूजर्सनी ही सर्व अ‍ॅप्स त्वरित त्यांच्या स्मार्टफोनमधून काढून टाकावीत. कारण ग्रिफोरस अँड्रॉइड ट्रोजन धोकादायक आहे. Google प्रतिबंधित अ‍ॅप सूचीमध्ये हॅन्डी ट्रान्सलेटर प्रो, हार्ट रेट आणि पल्स ट्रॅकर, जिओस्पॉट: जीपीएस लोकेशन ट्रॅकर, आयकेअर – फाइंड लोकेशन, माय चॅट ट्रान्सलेटर समाविष्ट आहे.

10 मिलियनहून अधिक यूजर्सना केले लक्ष्य
ग्रिफोरस अँड्रॉइड ट्रोजनने 10 मिलियहून अधिक गूगल अँड्रॉइड यूजर्सना लक्ष्य केले आहे. संशोधक म्हणतात की सामान्य ऑनलाइन घोटाळे फिशिंग तंत्राचा फायदा घेत असताना, ग्रिफोरस अँड्रॉइड ट्रोजन त्या अर्थाने अद्वितीय आहे. हे कमी वापरलेल्या अ‍ॅप्सच्या मागे लपलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *