‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरचा बोलबाला , विक्रीचा आकडा २५००० पेक्षा जास्त; किंमतही झाली कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । भारतात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे आणि लोक इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक बाइक-स्कूटर खरेदीवर भर देत आहेत. त्यातही कमी किंमतीत चांगली ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. त्यामुळे बजेट इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिमांड वाढली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल बनवणाऱ्या Komaki Electric Vehicles च्या इलेक्ट्रिक स्कूटर्सनाही शानदार प्रतिसाद मिळतोय. कोमाकीने गेल्या वर्षी कोमाकी एक्सजीटी एक्स-1 (Komaki XGT X1 Electric Scooter) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आणि १५ महिन्यांहून कमी कालावधीतच २५,००० पेक्षा जास्त XGT X1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाल्यापासूनच XGT-X1 Electric Scooter ची ग्राहकांमध्ये चांगली डिमांड असल्याचं कंपनीने गुरूवारी सांगितलं. तसेच १५ महिन्यांहून कमी कालावधीत २५,००० पेक्षा जास्त XGT-X1 विकल्याची माहितीही कंपनीने दिली. ही इलेक्ट्रिक स्कूटर २ व्हेरिअंट्समध्ये येते आणि अलीकडेच या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमततही कंपनीने कपात केली असून आता Komaki XGT-X1 च्या लिथियम आयन बॅटरी व्हेरिअंटची किंमत ६० हजार रुपये आणि जेल बॅटरी व्हेरिअंटची किंमत ४५ हजार रुपयांहून कमी झाली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर १२० किलोमीटरपर्यंत चांगली ड्रायव्हिंग रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. रिमोट लॉक, मोठी सीट, मल्टीपल स्टोरेज ऑप्शन, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, स्मार्ट डॅशबोर्ड, अँटी थेफ्ट लॉकिंग, सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टिमसह अन्य अनेक खास फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आहेत. कोमाकीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इमरजन्सी रिपेयर स्विच देखील आहे, त्याद्वारे युजर्सना टो रिपेयरची सेवाही मिळते. याशिवाय कंपनीकडे अन्य अनेक इलेक्ट्रिक स्कूटरही आहेत. कंपनीकडे ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसलेले ९ आणि ३ हाय-स्पीड मॉडल्स आहेत. २९,५०० रुपये ते ९९,००० रुपयांच्या रेंजमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *