कोरोना व्हायरसचा पर्यटनाला फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली-
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांनी आपल्या देशात परदेशी नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. याचा थेट परिणाम पर्यटनावर झाला असून कोल्हापुरातून युरोप, थायलंड, बँकाँकला जाणार्‍या पर्यटकांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन व्यवसायाला कोट्यवधीचा फटका बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसने काही रूग्ण विविध देशांमध्ये आढळून येत आहे. चीनमध्ये काही दिवसांत हजारो नागरिक मृत्युमुखी पडले तर अजूनही या व्हायरचा शिकार झालेले अनेक नागरिक चीनमध्ये मृत्युशय्येवर आहेत. जानेवारी ते मार्च महिना हा परदेशी पर्यटनचा सर्वाधिक चांगला काळ मानला जातो. या काळात युरोप सहलीला सर्वाधिक पसंती दिली जाते. पूर्वी कोल्हापूरातून हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पर्यटक युरोपला जात होते. पण आता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सुरू केलेल्या पॅकेज योजनांमुळे या तीन महिन्यांत पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे.

यासाठी अगोदरपासूनच पॅकेजचे बुकिंग केले जाते. पॅकेजमध्ये विमानाचा प्रवासाबरोबरच अलिशान हॉटेल मध्ये राहण्याची जेवणाची सोय, पर्यटन सफारी घडवून आणली जाते. कोल्हापुरातील अनेक पर्यटक बँकॉक व दुबई हाँगकाँगला जाण्यास सर्वाधिक पसंती देतात. या वाढत्या प्रतिसादामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळत होती.

पण कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. याचा फटका टूस अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला आहे. ज्यांनी या देशांमध्ये जाण्यास पॅकेज बुक केले होते ते रदृ करण्यात आले आहे. त्यामुळे विमान बुकींगचे पैसेही परत मागितले जात आहेत. सहली आयोजित करणार्‍या कंपन्यांना या पॅकेज मधूनच कमिशन दिले जाते, पण सहलच रदृ झाल्याने कमिशन कोठून मिळणार. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किती काळ राहील सांगता येत नाही. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होई पर्यंत पर्यटनाला याचा फटका सहन करावा लागणार आहे.

पर्यटनाला फटका : एन. एन. अत्तार
जानेवारी ते मार्च महिन्यात अमेरिका, फ्रान्स, लंडन यांसारख्या शहरांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. त्यामुळे अशा सहलींचे आयोजन करणार्‍या कंपन्यांची संख्या वाढली. पण, ऐन पर्यटनाच्या मोसमातच कोरोना व्हायरसचा फटका पर्यटन व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, असे ट्रॅव्हल्स एजंट फेडरेशनचे ऑफ इंडियाचे सदस्य व रसिका ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय संचालक एन. एन. अत्तार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *