आता देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू; नवी नियमावली जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । कोरोना महामारीच्या काळात लावण्यात आलेले हवाई वाहतुकीवरील निर्बंध आता हळू हळू हटवण्यात येत आहेत. त्यानुसार आता 18 ऑक्टोबरपासून विमान कंपन्या कोणत्याही बंधनाशिवाय देशांतर्गत उड्डाणं करू शकणार आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी हवाई प्रवासासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात पुर्णपणे बंद करण्यात आलेली हवाई वाहतूक व्यवस्था आता पुर्ववत झाली आहे. त्यानुसार आता 85 टक्के प्रवासी क्षमतेची मर्यादा 18 ऑक्टोबरनंतर नसणार आहे. त्यामुळे हवाई पुन्हा एकदा विमानं पुर्ण क्षमतेनं उड्डाण करू शकणार आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीनंतर परिस्थिीती लक्षात घेऊन निर्बंध कमी करण्यात आले आहेक. त्यानुसार 1 जुन ते 5 जुलैदरम्यान 50 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान ती 65 टक्के करण्यात आली, तर 12 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान ती 72.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर सध्या म्हणजेच 18 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत 85 टक्के प्रवाशांसह विमानं देशांतर्गत उड्डाणं घेत होती, तर आता या प्रवासावरील पूर्ण प्रवासी मर्यादा काढून टाकण्यात आल्याचे देशाच्या नागरी उड्डयण मंत्रालयाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *