संजय राऊत, नारायण राणे आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४- शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपाचे नेते नारायण राणे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते अरविंद सावंत या सगळ्यांनी चाय पे चर्चा केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे सगळे नेते एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहेत.

भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातून एरवी विस्तव जात नाही. मात्र त्यांचे अनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. हा फोटोही तेच दाखवून देतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा संजय राऊत हे सातत्याने भाजपाविरोधात बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली होती. आज मात्र शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते दिलखुलासपणे चहाचा आस्वाद घेताना दिसले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहेत. त्यामुळे दिल्लीत या पक्षांचे खासदार एकत्र आले तर ते आश्चर्य वाटण्याजोगं नाही. मात्र नारायण राणे या सगळ्यांमध्ये सहभागी झाले आणि या नेत्यांमध्ये चहा घेता घेता चांगली चर्चा झाली असंच हा फोटो सांगतो आहे. या फोटोमध्ये नारायण राणे, संजय राऊत, अरविंद सावंत, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू याच गोष्टीची साक्ष पटवून देतं आहे की या नेत्यांमध्ये मनमोकळी चर्चा झाली. आता चर्चेचा विषय काय होता ते समजू शकलेलं नाही मात्र पाचही नेत्यांनी छान हसत फोटोसाठी पोझ दिल्याचं स्पष्ट दिसून येतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *